कृषी उत्पन्न बाजार समिती पाथर्डी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर. या समितीची स्थापना दि.२१/१२/१९५५ झाली असून प्रत्यक्ष कामकाज सुरवात दि.०१/१०/१९५९ साली झाली याचा फायदा तालुक्यातील शेतकरी व तालुक्याबाहेरील शेतकरी वर्ग व व्यापारी वर्गाला खूप झाला आहे. समितीचे उद्दिष्टे शेतकऱ्यांना शेती मालाला चांगला बाजार भाव मिळून देऊन त्यांचा आर्थिक स्तर सुधारण्याचे आहे. त्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती पाथर्डी यांनी शेतकऱ्यांना शेती माल विकण्यासाठी भव्य असे बाजार आवार उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी आर्थिक उलाढाल चालते. शेतकऱ्याला व्यापारी वर्गाकडून मालाला योग्य भाव मिळून दिला जातो.
कृषी उत्पन्न बाजार समिती पाथर्डी चे वैशिष्ट्ये:
- शेती मालाची खुल्या लिलावाने विक्री व स्पर्धात्मक बोली लाऊन जास्तीत जास्त बाजार भाव शेतकऱ्यांना मिळवून दिला जातो.
- बाजार समितीचे अनुज्ञप्तीधारक यांकडून इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारे अचूक मोजमाप.
- विद्युत व्यवस्थेसाठी सौरपॅनल/इन्व्हर्टर व्यवस्था.
- शेतमालाच्या व्यवहाराच्या तक्रारीची त्वरित दखल घेतली जाते.
- सर्व सुखसोयीयुक्त बाजार आवार.
- आडते, व्यापारी व शेतकऱ्यांकरिता बाजार आवारात ५० टनी भुई काटा दिवस-रात्र उपलब्ध.
- बाजार आवारामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या रक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे.
- बाजार भाव प्रदर्शित करण्याकरिता बाजार आवारात एलईडी डिस्प्ले व स्टिकर बोर्ड.
क्रमांक | माहिती | तपशील | |||
---|---|---|---|---|---|
१ | बाजार समितीची स्थापना तारीख | दि.२१/१२/१९५५ प्रत्यक्ष कामकाज सुरवात दि.०१/१०/१९५९ | |||
२ | बाजार क्षेत्रात समाविष्ट तालुक्याचे नाव | संपूर्ण पाथर्डी तालुका | |||
३ | समाविष्ट एकूण गावांची संख्या | १३२ गावे | |||
४ | पैकी बाजार क्षेत्रात समाविष्ट गावांची संख्या | १३२ गावे | |||
५ | बाजार ज्या गावी आहे त्या गावांची नावे | मुख्य बाजार पाथर्डी |
उपबाजार तिसगाव |
उपबाजार खरवंडी कासार |
उपबाजार टाकळीमानूर |
६ | बाजार जाहीर झाल्याची अधिसूचना तारीख | दि.२१/१२/१९५५ | दि.२०/८/१९८१ | दि.२५/३/१९८४ | दि.२६/७/१९७९ |
७ | बाजार समितीस स्वतःची इमारत आहे काय ? | होय | होय | होय | होय |
८ | जनावराचा बाजार आहे काय | होय | नाही | नाही | नाही |
९ | बाजार स्वतःच्या मालकीचा आहे काय | होय | होय | होय | होय |
१० | नियमनाखालील वस्तूची यादी | ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, मठ, मुग, तूर, हुलगा, कापूस, तील, जवस, वरई, चवळी, भुईमुगशेंगा, शेंगदाणे, गूळ, सरकी, बैल, म्हैस, गाय, रेडा, शेळी, मेंढी, कोंबडी, अंडी, चामडी, लोकर, भात, आंबाडी, एरंडी, ताग, सुर्यफुल, आंबे, मोसंबी, संत्री, केळी, चिकू, खरबूज, पपई, सीताफळ, पेरू, बटाटा, रताळी, कांदा, लसून, पालेभाज्या, लिंबू, बडीशेप, सुपारी, हळद, धने, वेलची, मेथी, मोहरी, मिरे, जिरे, चिंच, नारळ, गवत, वैरण, लिंबोळ्या. |